Thursday, September 18, 2025

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई : गुरुवारी सकाळ पासून मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई पट्ट्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दुपारनंतर जोर पकडला होता. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कुर्ला मार्गावरील लोकल अतिशय धीम्या गतीने धावत आहे. परिणामी मध्य रेल्वेवरील अप -डाऊन मार्गावरील धीम्या आणि जलद लोकल सेवा १०ते १५ मिनिटे उशीराने धावत आहे. पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक मंदावली असून, याचा फटका प्रवाशांना बसला आहे.

Comments
Add Comment