Sunday, September 14, 2025

मुकेश अंबानींनी दिला रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा

मुकेश अंबानींनी दिला रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा

मुंबई (हिं.स.) : रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली. आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिलायन्स जिओ संचालक मंडळाची सोमवारी रोजी बैठक झाली. या बैठकीत संचालक मंडळाने आकाश अंबानी यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

याशिवाय बैठकीत अन्य काही जणांकडे जबाबदा-या सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी पंकज मोहन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज मोहन पुढील पाच वर्षे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहे. रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही चौधरी यांची कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment