Wednesday, September 17, 2025

ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर लोकल सेवा विस्कळीत

ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्ग पहिल्याच पावसात ठप्प झाला आहे. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

वाशी आणि सानपाडा स्टेशन दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने ठाणे वाशी मार्ग बंद आहे. मात्र ठाणे पनवेल, ठाणे नेरूळ, मार्ग सुरू आहे. पहिल्याच पावसात लोकलसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप झालेला दिसून येत आहे.

Comments
Add Comment