Wednesday, September 17, 2025

रेल्वेकडून तब्बल १४७ गाड्या रद्द

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशभरातील निर्बंध शिथिल केल्यामुळे जनजीवन पुन्हा पूर्ववत झाले आहे. मात्र रेल्वे गाड्यांबाबतचा असलेला गोंधळ अजूनही कमी झाला नसल्याचे चित्र आहे.

भारतीय रेल्वेकडून आज १४७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच इतर १९ गाड्या वेळेवर चालणार की नाही, याबाबत अनिश्चिता आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, याची माहिती वेबसाइट https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/  येथे देण्यात आली आहे. अचानक रेल्वे गाड्या का रद्द करण्यात आल्या आहेत, यामागील कारणाचा खुलासा रेल्वेकडून अधिकृतरित्या करण्यात आलेला नाही. मात्र तांत्रिक कारणांमुळे रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >