
गुडीपाडव्याला साईबाबांनी शिर्डीत सर्वात उंच गुडी उभारली व सर्वत्र साईनामाचा झेंडा उभारला. श्रद्धा, सबुरी, प्रेम-आशा-ईश्वरीशक्ती, मातृपितृभक्ती, गुरुभक्ती, परिश्रमभक्ती, निसर्ग-भक्ती ही सारी प्रेम कल्पना साईनाथांनी आपल्या भक्तांना शिकवली. शिर्डीमधे चैत्र महिन्यातील पाडव्यानंतरच्या नवव्या दिवशी येणाऱ्या रामनवमीची तयारी सर्वात मोठ्या उत्सवासारखी तीन दिवस चालत असे. पंचक्रोशीतून येणाऱ्या भक्तांमुळे रामनवमीला शिर्डीला जत्रेसारखे स्वरूप येई. सुंदर पाळणा सजवून त्यात राजारामाची सुंदर बालकरूपी मूर्ती स्थापन करून त्यांची पूजा-अर्चा करून, पाळणा हलवून मुले, मुली, भक्तजन, भजनकीर्तन व आनंदाने आरती करीत. गोलगोल फेर धरून सुंदर कपडे घालून नाचत, गात रामाची गाणी म्हणत असत. द्वारकामाई, लेंडीबाग, बुटीवाडा, देशपांडे वाडा, देखमुख तर्खडकरांचा वाडा सारेच सुशोभित करून रामाची व साईरामांची पालखी काढून गावभर दर्शन देऊन परत येत. साईराम, राजाराम व साईभक्त हा रामजन्म आनंदाने साजरा करीत. सुंठवडा, साईप्रसाद, भंडारा जेऊन हजारो लोक तृप्त होतात.
सुरू आनंदी चैत्रगुडीपाडवा रामनवमीला रामाला बोलवा ।। १।। दशरथपुत्र रामाचा तो गोडवा रामाचा पाळणा मनात आता हालवा।। २।। साई सांगे पूजा तुम्ही राम जीवनात प्रत्यक्ष आणा राम ।। ३।। कामात जीव प्राण राम रोमा रोमात राम नाम ।। ४।। नाही वेगळे साई नाम साईनामात दडले रामनाम ।। ५।। रामनामातच आहे शामनाम श्यामराम दोघात साईनाम।। ६।। ईश्वर अल्ला राम नाम करा नेकीने जोरात काम ।। ७।। दिवस-रात्र गाळा घाम प्रसन्न होईल सीताराम।। ८।। वाट पाहे विष्णू सहस्त्रनाम प्रसन्न लक्ष्मीविष्णू नाम ।। ९।। प्रसन्न सारी रूपे एकदाम सारे खूष घेता रामनाम ।। १०।। साईनाम एकच रामनाम चतुराईने घ्या श्यामनाम।। ११।। प्रसन्न हनुमान घेता रामनाम पळून जातील रावण घेता रामनाम ।। १२।। उठवा कुंभकर्ण घेऊनी रामनाम गरूड येतील घेता रामनाम ।। १३।। जटायू लढेल घेऊन रामनाम सुग्रीव, अंगद तरले रामनाम ।। १४।। मारीचाला मारेल रामनाम राक्षसाना पळवेल रामनाम ।। १५।। सोन्याची लंका जिंकाल रामनाम प्रेमाचे पूलबांधा घेऊनी रामनाम ।। १६।। आसेतु हिमाचाल रामनाम जभगर गेले साईराम रामनाम ।। १७।। श्रद्धासबुरी प्रेम रामनाम साईरामही घेती रामनाम ।। १८।।
विलास खानोलकर vilaskhanolkardo@gmail.com