Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची खासगी वाहनांकडे धाव

वाडा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने वाडा आगारातील दोनशेपेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी झाल्याने वाडा आगारातील फक्त सहा बस रस्त्यावर धावत आहेत. त्या ग्रामीण भागात चालतात. मात्र, अंबाडी, कुडूस, नेहरोली, मनोर, कंचाड, गारगाव, परळी, तीळसा व तालुक्यच्या अती दुर्गम भागातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रोज शिकण्याच्या निमित्ताने वाड्यात येत आहेत. राज्य परिवहनच्या बस बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांना खासगी वाहनांकडे धाव घ्यावी लागत आहे.

सुरुवातीला वर्गातील निम्म्या विद्यार्थ्यांना व उर्वरित दुसऱ्या दिवसी शाळेत बोलावले जायचे. मात्र, आता नियमितपणे शाळा सुरू झाल्याने विध्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती लागत आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची गर्दीही वाढली आहे. तथापि, बस बंद असल्यामुळे लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यासाठी बस सेवा लवकरात लवकर सुरू होण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. यापुढे ते होऊ नये यासाठी शासकीय स्तरावर संपावर तोडगा काढून बस सेवा पूर्ववत चालू करावी. - अनंता वणगा, अध्यक्ष, आदिवासी मुक्ती संघटना

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >