Sunday, September 14, 2025

अनिल देशमुखांच्या कोठडीमध्ये २७ तारखेपर्यंत वाढ

अनिल देशमुखांच्या कोठडीमध्ये २७ तारखेपर्यंत वाढ

मुंबई (प्रतिनिधी): माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी देशमुखांना सध्या आर्थर रोड जेल कारागृहात ठेवण्यात आले आहे.

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुखांनी १०० कोटींच्या खंडणीची मागणी केलीच नव्हती, असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. आपण शहरातील बार किंवा हॉटेलच्या मालकांकांकडून किंवा त्यांच्या संबंधितांकडून कधीही पैसे गोळा केले नाहीत, असे सचिन वाझेंनी चांदीवाल आयोगासमोर सांगितले आहे. दरम्यान, तसेच देशमुख यांचे स्वीय सहाय्यक (पीए) संजीव संजीव पालांडे यांनी त्यांच्याकडे कधीही आर्थिक मागणी केलेली नाही आणि ते त्यांना केवळ एकदाच अधिकृत कारणांसाठी भेटले होते, असे वाझे यांनी यापूर्वी त्यांच्या साक्षीत स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment