 
                            नवी दिल्ली : काही वेळेसाठी ढासळलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीटर @narendramodi पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आले आहे.
ट्वीटरद्वारे या संदर्भात अधिकृत माहिती देत पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीटरमध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या. लगेच ही समस्या ट्वीटरपुढे मांडण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीटर पूर्ववत करण्यात आले.
दरम्यान या काळात करण्यात आलेले ट्वीट आणि संदेश दुर्लक्षित करावे असे आवाहन पंतप्रधान कार्यालयाने केले.

 
     
    




