Thursday, January 15, 2026

एसटी कर्मचा-यांना शेवटची संधी

एसटी कर्मचा-यांना शेवटची संधी

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी दिली आहे.  सोमवारपर्यंत जे ST कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर घेतलं जाईल, तसंच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल,  जे कर्मचारी कामावर आले आहेत, त्यांना वेतनवाढ दिली आहे. आणि जे कामावर येतील त्यांनाही वेतनवाढ दिली जाईल, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. 

सोमवारपर्यंत आम्ही मेस्मा लावणार नाही.. सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामाला येतील त्यांना कामावर घेतलं जाईल. त्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाईल.  निलंबित कामगार यांनी ही कामावर यावं.  त्यांना ही संधी दिली जाईल.  जर कुणाला अडवण्यात आलं तर त्यांना पोलीस संरक्षण दिलं जाईल, असंही ते म्हणाले.

आतापर्यंत एसटीचं 550 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, असंही परब यांनी सांगितलं

Comments
Add Comment