Tuesday, November 25, 2025

मुंबई विमानतळावर ३५ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त

मुंबई विमानतळावर ३५ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त

मुंबई - मुंबई विमानतळावर २४७ कोटी रुपयांचे ३५ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एअरपोर्ट इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली आहे.

या प्रकरणी झिम्बाब्वेच्या २ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यात ४६ वर्षीय महिला आणि २७ वर्षीय पुरुष प्रवाशाचा समावेश आहे. दोघांनाही एअरपोर्ट इंटेलिजन्स युनिटने ताब्यात घेतले आहे. या कारवाईने ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Comments
Add Comment