Categories: कोलाज

दुसरी बायको

Share

प्रत्येक पुरुषाला आपल्या बायकोपेक्षा शेजाऱ्याची बायको आवडणे हा प्रकार तर सर्रास आढळून येतो. त्यामुळे शेजाऱ्याची बायको कितीही आवडली तरी ‘वहिनी’ हे संबोधन गरजेचे आणि संस्कारी जपणूक करणारे, ‘नॉन कमिटल’ संबोधन निर्माण होते. एकदा दोघे मित्र फिरत नव्या साड्यांच्या दुकानात गेले. साड्यांच्या ढिगाकडे पाहताच ओळखीचा स्वर कानी आला, काय करताय? बायकांच्या साड्यांच्या दुकानात? नौरोजी गप्प, मख्ख उभे. दुकानदार हसून म्हणाला, “दुसरी बायको” दुकानाचे नाव ‘आज’ सार्थ झाले.

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

कल्पनाच किती मोहक आहे की नाही?
प्रत्येकाला (म्हणजे ‘नर’ जनांना) पहिलीच्या वटवटीचा कंटाळा लवकरच येतो. काही महिन्यांतच असा बदल हवाहवासा वाटतो.

आपल्या बायकोपेक्षा शेजाऱ्याची बायको आवडणे हा प्रकार तर सर्रास आढळून येतो. उघड उघड बोलता येत नाही, पण ‘वहिनी’ हे संबोधन जनात अन् प्रिये, प्रियतमे, प्रियकरिणी अशी अत्यंत आवडती संबोधने मनात अगदी न चुकता, प्रत्येक विवाहित पुरुष ती वापरतो.

मंजिरी अशीच मनोजला आवडायची. आता शेजारी असलेल्या नराची, मित्रवर्याची पत्नी असल्याने ‘वहिनी’ हे संबोधन गरजेचे आणि संस्कारी जपणूक करणारे, ‘नॉन कमिटल’ संबोधन अर्थात होते.
“किती पुढे पुढे करता हो मंजिरी आली की?” बायको दमदाटी करी. पण तिला पक्की खात्री होती की सरडा ‘वहिनी’ पुढे ‘धावणार’ नाही. दुसरी बायको परवडते का या महागाईच्या दिवसांत? आपल्या हिच्या साड्या घेताना (म्हणजे खरेदी करताना) तोंडाला येतो फेस! म्हणजे दुसरीची ‘केस’ कुठे लढवा?
त्यापेक्षा “वहिनी, किती छान दिसता या साडीत!” अशी तोंड पाटिलकी पुरेशी होते, नाही का?
मनोजने अशी स्तुती शेजारणीची केली, असे बायकोला समजले, तेव्हा ती उखडली. रागे रागे म्हणाली, “दुसरी बायको करायचा विचार आहे वाटतं नौरोजींचा?”

“छे गं.”
“मग? शेजारणीच्या किती पुढे पुढे करता?”
“चुकलो गं क्षमा कर. आता बघ.”
“काय बघू?”
“तुझ्याच पुढे पुढे करतो या क्षणापासून.”
“दॅट इज गुड. शहाणा तो माझा नवरा!”
बायकोकडून प्रत्यक्षात दाद मिळल्यावर नवरे जसे फुशारतात तसा हा नौरोजीही फुशारला.
शेजारच्या नवऱ्याबरोबर ‘हा’ फिरायला गेला; तेव्हा त्याने मनाचा दरवाजा उघडला.
“खरं खरं सांगा हं शेजारीपतं. माझी बायको तुम्हाला आवडते ही गोष्ट खोटी की खरी?”
“खरं तर दुसरी… म्हणजे दुसऱ्याची बायको प्रत्येक पुरुषास हवीशी वाटते. मी अपवाद कसा असे ना?”
“ही आवडते?”
“खूप. खूपच आवडते.”
“अरे ती घोड्यासारखी खिंकाळते हसतांना!”
“मला तेच हिच्याबाबतीत असेच वाटते. घोडी वाटते घोडी!”
“दे टाळी तेरी मेरी जोडी जमी.”
“दुसरी बायको आवडी?”
“खूप म्हणजे खूपच आवडी. डबल, टिबल, चौबल, नऊबल आवडी.”
“चल पण आपण अदलाबदल करूया का?”
“कल्पना रम्य आहे. दुसरी बायको! मस्त मस्ताड आहे विचार.”
“बोलण्याची हिंमत आहे?”
“अजिबात नाही.”
“फिर? फुसका बार! नुसता हवा महल!”
“हवा महल तो हवा महल! सुख मिला की नाही?”
“भरपूर सुख. सुख ही सुख!”
“अरे बाजारात नवे दुकान आले आहे.”
“कपड्यांचे आहे का?”
“हो. नयी नयी साडियाँ. अच्छी अच्छी साडियाँ.”
“अरे वा! चल देखेंगे. बायको खूश होगी. नयी साडी देखकर.” दोघे मित्र फिरत फिरत दुकानी गेले.
नव्या साड्यांचा ढीग दुकानात पडलेला दिसला.

खुशी खुशी त्या साड्याच्या ढिगाकडे बघत राहिले! विस्मयचकित होऊन गेले.
इतक्यात ‘ओळखीचा’ स्वर कानी आला. अरे, तर हा चिरपरिचित आवाज सत्तत ऐकून कानात दडे बसलेला.
“काय करताय? बायकांच्या साड्यांच्या दुकानात?” आवाज चिरकला. नौरोजी गप्प गप्प, मख्ख मख्ख उभे. दुकानदार समजला. हसून म्हणाला, “दुसरी बायको” हे दुकानाचे नाव हे ‘आज’ सार्थ झाले.

Recent Posts

IAF Recruitment 2024 : युवकांना पायलट होण्याची सुवर्णसंधी! तब्बल ३०४ पदांची मेगाभरती

'असा' करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : भारतीय हवाई दलात पायलट होऊ इच्छिणाऱ्या…

22 mins ago

Pune Car accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी कारवाईबाबत दोन्ही अर्ज कोर्टाने फेटाळले!

कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाल्याने पुणे पोलीस आयुक्तांचं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी…

2 hours ago

Education News : दहावीचे विद्यार्थी यंदा अतिरिक्त गुणांना मुकणार; जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत अतिरिक्त गुण मिळत असलेले…

2 hours ago

HSC Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर! ‘मुलींची बाजी आणि कोकण टॉप’ची परंपरा कायम

मुंबई विभागाने मात्र गाठला तळ मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी ज्याची वाट पाहत…

3 hours ago

Gold-Silver Rate Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदीच्या दराला सुवर्णझळाळी!

जाणून घ्या सध्याचे दर काय? नवी दिल्ली : गेल्या महिन्यात सोन्याने विक्रमी पातळी गाठली होती.…

3 hours ago

Flamingo birds death : घाटकोपर पूर्व परिसरात अचानक २५ ते ३० फ्लेमिंगोंचा मृत्यू!

रस्त्यावर आढळली फ्लेमिंगोची पिसे आणि सांगाडे; मृत्यूचं कारण मात्र अस्पष्ट मुंबई : मानवाने केलेल्या पर्यारणाच्या…

4 hours ago