किराणा दुकान, बेकरीमध्ये वाईनची विक्री?

Share

मुंबई:  राज्य सरकारनं किराणा दुकान, डिपार्टमेंटल स्टोर, बेकरीमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी सुरु केली आहे. दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटींची भर पडणार आहे. मात्र वाईनची किती विक्री होते याची नोंद सरकारला ठेवता येणार आहे.. सध्या राज्यात दरवर्षी  वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

या नव्या धोरणांमुळे  सरकारनं काल वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या  धर्तीवर कॅनमधून विक्रीला येऊ शकते.

Recent Posts

Marathi Vs Gujrati : गिरगावनंतर घाटकोपरमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना गुजराती रहिवाशांकडून प्रवेशबंदी

निवडणुकीपूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळणार? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या राजकीय…

2 hours ago

Sugar Price Hike : तूरडाळ व तांदळाच्या दरवाढीनंतर आता साखरही कडवटणार!

प्रतिकिलो 'इतक्या' रुपयांची दरवाढ नागपूर : निवडणुकांची रणधुमाळी तसेच कडाक्याच्या उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीमची मोठ्या…

2 hours ago

ICSE Board चा दहावी-बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींची बाजी

जाणून घ्या मार्कशीट कशी डाऊनलोड कराल? नवी दिल्ली : काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट…

3 hours ago

Google Chrome : सावधान! गुगल क्रोम युजर्सना सरकारचा अलर्ट; होऊ शकते मोठे नुकसान!

लवकरच करा 'हे' अपडेट मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकाचे आयुष्य इंटरनेटवर आधारित आहे. कधीही कोणतीही…

3 hours ago

Illegal money : पैशांचा पाऊस सुरुच! काँग्रेस मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली रोकड

रक्कम इतकी मोठी की नोटा मोजणाच्या मशीन्स मागवल्या मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात…

4 hours ago

१००१ दिवसांच्या गुंतवणुकीवर ९टक्के व्याज, ही बँक देत आहे FDवर बेस्ट ऑफर

मुंबई: सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार रिटर्नच्या बाबतीत काही काळापासून फिक्स डिपॉझिट स्कीम्सला अधिक लोक अधिक…

6 hours ago