दुधाच्या सायीमध्ये खूप जास्त तेलकट अंश असतो. त्यामुळे थंडीतही त्वचा मऊ राहते. यात चिमूटभर हळद घालून ती चेहरा, मान, हात आणि पायाला लावावी. यामुळे कोरडी त्वचा मुलायम बनते.
जर तुमची त्वचा खूप जास्त रुक्ष आणि कोरडी पडत असेल तर ऑलिव्ह ऑईलचा वापर उपयुक्त ठरतो. त्यासाठी अर्धा कप थंड दुधात ऑलिव्ह ऑईल मिसळा. कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल.