त्याच कढईत १ चमचा साजूक तूप घालून गूळ घाला. गूळ मंद आचेवर हलवत राहा जोपर्यंत तो पूर्णपणे वितळत नाही. गुळाचा पाक २-३ मिनिटे चिकटसर होईपर्यंत हलवत रहा.
गुळाचा पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेले तीळ घाला आणि लगेचचं ढवळा. या मिश्रणात वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालून हे मिश्रण एका सारखे होईपर्यंत हलवत रहा.
मिश्रण थोडे कोमट झालं की, मग तुपाचा हात लावून लाडू वळा. मिश्रण जास्त थंड झाल्यास लाडू वळणे कठीण होऊ शकते, त्यामुळे हे काम झपाट्याने करा.