हिवाळ्यात पायांची घ्या  अशी काळजी!

पायांना मॉइश्चरायझ करा

हिवाळ्यात आपले पाय लगेच कोरडे होतात त्यामुळे पायांना खाज सुटे त्यामुळे पायांना रोज मॉइश्चरायझ आणि मसाज करा.

पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवा

थंडीत आपले पाय लगेच कोरडे तर होतात. त्याचबरोबर टाचांना भेगा देखील पडतात. अशावेळी गरम पाण्यात शॅम्पू आणि लिंबाचा रस घाला. आता 15 ते 20 मिनिटे पाय बुडवून ठेवा. नंतर क्लिनिंग ब्रश आणि प्युमिस स्टोनने पाय स्वच्छ करा. टाचांना भेगा देखील पडणार नाही.

सनस्क्रीन लावा

 हिवाळ्यात देखील त्वचेला सनस्क्रीनची गरज असते. त्यामुळे पायांना सनस्क्रीन लावा.

पायांच्या नखांची काळजी घ्या

जर तुम्हाला तुमचे पाय सुंदर दिसावे असं वाटत असेल तर वेळीच पायांची नखे कापा.

तेलाने मसाज करा

हिवाळ्यात आपले पाय कोरडे पडू लागतात त्यामुळे तेलाने पाय मसाज करा.