सकाळी ब्रेकफास्टला निरोगी  आणि चवदार ७ स्प्राऊट्स नक्की खा

मूग डाळ ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. याचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज वाढत नाहीत.

मूग डाळ स्प्राऊट्स

काळ्या हरभऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. काळ्या हरभऱ्याचे स्प्राऊट्स खाल्ल्याने लोह, फोलेट आणि प्रोटीन जास्त प्रमाणात मिळतं.  यामुळे आपले स्नायू मजबूत होतात. 

काळ्या चण्याचे  स्प्राऊट्स 

जिमला जाणारे लोक जास्त प्रमाणात सोयाबीन स्प्राऊट्स खातात कारण त्यामध्ये जास्त प्रथिने आढळतात. 

सोयाबीन स्प्राऊट्स 

 अल्फल्फा स्प्राउट्समुळे  त्वचा चमकते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

अल्फाल्फा स्प्राउट्स

मुळा स्प्राउट्स व्हिटॅमिन सी आणि डिटॉक्स गुणधर्मांनी समृद्ध असतात. ते शरीर स्वच्छ करतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात.

मुळा बियाणांचे स्प्राउट्स

गव्हाच्या बियांचे स्प्राऊट्स खाल्ल्याने त्वचेला चमक येते आणि दीर्घकाळ ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य करते.

गव्हाच्या बियांचे स्प्राऊट्स

मसूर डाळ स्प्राउट्स खाल्ल्याने हृदयाच्या समस्या दूर राहतात आणि एखाद्याला दीर्घकाळ भूक लागत नाही.

मसूर डाळ स्प्राउट्स