पावसात मोबाईल भिजला तर या गोष्टी नक्की ट्राय करा

मोबाईल बंद करा : भिजलेला फोन लगेच बंद करा, नाहीतर शॉर्ट सर्किट होऊन फोन कायमचा खराब होऊ शकतो.

पार्ट्स बाहेर काढा:  फोनचे कव्हर, सिम ट्रे आणि बॅटरी लगेच वेगळे करा.

तांदळाचा वापर :  फोन कोरडा करण्यासाठी तो तांदळाच्या डब्यात २४ ते ४८ तास ठेवा.

हवेशीर ठिकाणी ठेवा:  फोन फॅनच्या किंवा खिडकीतून येणाऱ्या नैसर्गिक हवेच्या वाऱ्यात ठेवा.

स्पीकरमध्ये पाणी अडकल्यास प्ले स्टोअर किंवा यूट्यूबवर 'ClearWave' किंवा 'Water Eject' असे साऊंड (ऑडिओ) प्ले करा

चार्जिंग करू नका:  भिजलेला मोबाईल लगेच चार्जिंगला लावणे जीवघेणे ठरू शकते 

ड्रायर वापरणे टाळा: हेअर ड्रायरची उष्णता फोनचे प्लास्टिक आणि अंतर्गत सर्किट्स वितळवू शकते.