फोटो सौजन्य : ANI
आयसीसीने महिलांची क्रमवारी जाहीर केली आहे. स्मृती मंधाना आणि श्री चरणी यांचे वर्चस्व कायम आहे.
फोटो सौजन्य : ANI
स्मृती मंधाना आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. तर श्री चरणी टी20 गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
फोटो सौजन्य : ANI
स्मृती मंधानाने एकदिवसीय सामन्यांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
फोटो सौजन्य : ANI
स्मृती मंधानाकडे 790 रेटिंग गुण आहेत, तर हरमनप्रीत कौर नवव्या क्रमांकावर आहे.
फोटो सौजन्य : ANI
टी20 गोलंदाजीत श्री चरणी अव्वल स्थानी कायम आहे. फलंदाजीत शफाली वर्मा चौथ्या, मंधाना पाचव्या आणि हरमनप्रीत कौर दहाव्या स्थानी आहेत.
फोटो सौजन्य : Instagram
महिलांच्या टी20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. ती चौथ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिचा सहावा क्रमांक आहे.
फोटो सौजन्य : ANI
महिलांच्या टी20 आणि एकदिवसीय सांघिक क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे.
फोटो सौजन्य : ANI