असा तयार होतो इंद्रधनुष्य? जाणून घ्या या सुंदर निसर्गचमत्कारामागील विज्ञान!
जेव्हा आकाशात पाऊस पडत असतो आणि त्याच वेळी सूर्यप्रकाशही असतो, तेव्हा
इंद्रधनुष्य
दिसण्याची शक्यता वाढते.
पावसाचा प्रत्येक थेंब एका छोट्या
प्रिझम
सारखे काम करतो. सूर्यप्रकाश थेंबात शिरल्यानंतर त्याचे विभाजन होते.
सूर्यप्रकाश
पांढरा दिसतो, पण त्यात सात रंग दडलेले असतात. थेंबामधून जाताना हे रंग वेगळे होतात.
इंद्रधनुष्यातील
७ रंग
लाल, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा,
पारवा
आणि जांभळा हे सात रंग इंद्रधनुष्यात दिसतात.
थेंबामध्ये
प्रकाश
परावर्तित होतो आणि बाहेर पडताना पुन्हा वाकतो. त्यामुळे रंगांची कमान तयार झालेली दिसते.
तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्यानुसार इंद्रधनुष्याचा कोन बदलतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला दिसणारे
इंद्रधनुष्य
वेगळे असते.
कधी-कधी प्रकाश थेंबात दोनदा परावर्तित होतो. अशावेळी मुख्य इंद्रधनुष्याबरोबर दुसरे फिकट
इंद्रधनुष्यही
दिसते.
Click
Here