केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खा 'ही' फळं
केस मजबूत, दाट आणि चमकदार ठेवण्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे.
संत्री : व्हिटॅमिन C भरपूर असल्याने कोलेजन निर्मिती वाढते आणि केस मजबूत होतात.
पेरू : अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुळे केस गळणे कमी होण्यास मदत होते.
आवळा : केसांच्या वाढीसाठी उपयुक्त; मुळांना बळकटी देऊन अकाली पांढरे होणे कमी करतो.
केळी : पोटॅशियम आणि बायोटिनमुळे केसांना नैसर्गिक चमक आणि मजबुती मिळते.
पपई : व्हिटॅमिन A मुळे टाळूचे आरोग्य सुधारते आणि कोंड्याची समस्या कमी होते.
डाळिंब : रक्ताभिसरण सुधारून केसांच्या मुळांना पोषण पुरवते.
स्ट्रॉबेरी : सिलिका आणि व्हिटॅमिन C मुळे केस अधिक मजबूत आणि निरोगी राहतात.
किवी : व्हिटॅमिन E आणि अँटिऑक्सिडंट्समुळे केस तुटणे कमी होते.
रोजच्या आहारात विविध फळांचा समावेश केल्यास केसांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते.
Click Here