मैद्याची खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीची करंजी खा!
रेसिपी नक्कीच पाहा
सर्वप्रथम ३ ते ४ मिनिटे सूखे खोबरे आणि रवा भाजून घ्या.
त्यानंतर एका कढईत तूप घालून सुका मेवा भाजून घ्या.
यानंतर एका ताटात पिठी साखर, वेलची पूड घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
नंतर पराती मध्ये मैदा चाळून घ्या. यामध्ये ४ टेबलस्पून तूप गरम करून पीठाचा गोळा तयार करा.
आता थोडे पीठ मळून त्याचे
छोटे-छोटे गोळे करुन पोळी लाटून घ्या.
पीठाच्या गोळ्यामध्ये तयार सारण ठेवून सर्व बाजूंनी पाणी लावा. त्यानंतर साचाने करंजी कापून घ्या.
आता कढई मध्ये तेल घालून गरम करा. त्यामध्ये एक एक करंजी सोडून स्लो गॅसवर तळून घ्या.
अशाप्रकारे तयार होईल मैद्याची खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीची करंजी.
CHECK IT OUT