आली दिवाळी...!
यंदाच्या दिवाळीत घराची सजावट
आणि फराळाची तयारी कशी करायची ? जाणून घेऊया सोप्या टिप्स!
खमंग आणि गोड फराळ :
लाडू, चिवडा आणि तोंडात टाकताच विरघळणारी घरची 'काजू कतली' यंदाच्या दिवाळीची खरी शान!
आकाशकंदील आणि पणत्या : बाजारातले महागडे कंदील आणण्यापेक्षा घरच्या घरी पेपर किंवा वेस्ट मटेरियलपासून बनवा इको-फ्रेंडली कंदील!
पणत्यांची जादू :
चायनीज लाइट्सपेक्षा मातीच्या पणत्यांना प्राधान्य द्या. तेला-तुपाच्या दिव्यांनी घर उजळून टाका आणि सकारात्मक ऊर्जा आणा.
फुलांची किंवा रंगांची रांगोली : दारासमोर सुंदर रांगोली काढून लक्ष्मीमाताचे स्वागत करा. झेंडूच्या फुलांची सजावट घराची शोभा वाढवेल.
पारंपरिक लूक:
दिवाळीत नवीन पारंपरिक कपडे घाला. रेशमी साड्या आणि कुर्ता-पायजामा घालून सणाचा आनंद द्विगुणित करा.
उत्सव कुटुंबासोबत :
फटाके फोडताना सुरक्षेची काळजी घ्या. लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देऊन हा आनंद कुटुंबासोबत अनुभवा.