तांदूळ, हरबरा डाळ, उडीद डाळ, तूर डाळ धूवून दोन तीन तास पसरवून वाळू द्या. नंतर त्यात पोहे, धने, जिरे आणि ओवा घालून दळावे. या पीठात मीठ, लाल तिखट आणि ओवा बारिक घालून एकजीव करा. यामध्ये गरम पाणी टाकून पीठाचा गोळा करुन मशिनच्या साह्याने चकली बनवून तेलात तळून घ्या.
नाचणीच्या पीठात बेसन, मीठ, मिरची, जिरे आणि तीळ एकत्र करून मशिनच्या साह्याने चकली बनवून सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्या आणि त्याच्या आस्वाद घ्या.
उडीद डाळीच्या पीठात तूप, तीळ, हळद, मीठ आणि लाल तिखट मिसळून घ्या. यानंतर पीठाचा गोळा तयार करा. नंतर मशिनच्या साह्याने चकली बनवून तेलात तळून घ्या.