विंडीजने इतिहास घडवला, भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

फोटो सौजन्य :  ANI

गुवाहाटी वनडेत वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांनी शतके ठोकली. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असं घडलं.

फोटो सौजन्य :  ANI

जॉन कॅम्पबेल, कर्णधार शाई होप आणि मग आमिर जांगूने शतक ठोकलं. 

फोटो सौजन्य :  ANI

वनडे क्रिकेटच्या इतिहासात एकाच संघातील तीन खेळाडूंनी शतके झळकावण्याची ही केवळ सहावी वेळ आहे.

फोटो सौजन्य :  ANI

एकाच संघातील तीन फलंदाजांनी वनडेत शतक झळकावण्याचा पराक्रम 2015 मध्ये सुरू झाला. आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी विंडिजविरुद्ध शतके झळकावली होती.

फोटो सौजन्य :  ANI

भारताच्या विरोधात एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. वनडेत दोनदा भारताविरुद्ध तीन शतके झळकावली गेली आहेत. नकोसा विक्रम असणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. 

फोटो सौजन्य :  ANI

दक्षिण आफ्रिकेने 2015 मध्ये भारताविरुद्ध असा पराक्रम गाजवला. मुंबई वनडेत क्विंटन डी कॉक, फॅफ डु प्लेसिस आणि एबी डिव्हिलियर्स यांनी शतके झळकावली होती. 

फोटो सौजन्य :  ANI