पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील 7 मोठे निर्णय!

नोटाबंदी (2016) 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय.

जीएसटी लागू (2017) 'वन नेशन, वन टॅक्स' संकल्पनेअंतर्गत देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू.

कलम 370 रद्द (2019) जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द; राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन.

तीन तलाक कायदा (2019) मुस्लिम महिलांना तात्काळ तीन तलाकपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा लागू केला.

राम मंदिर उभारणी अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला वेग; 2024 मध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली.

कोविड लसीकरण मोहीम जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमांपैकी एक मोहीम भारताने यशस्वीपणे राबवली.

चांद्रयान-3 चे यश भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला .

सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान! अनेक महत्त्वाच्या निर्णयांमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ भारतीय राजकारणात विशेष ठरला.