यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस जे काही निर्णय घेईल, त्याला भाजप पक्ष आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल. राष्ट्रवादीचे नेते दोन वेळा माझ्याशी चर्चा करून गेले असून, या चर्चेत त्यांनी पक्षाची कार्यपद्धती, उपलब्ध पर्याय आणि पुढील वाटचाल याबाबत माहिती दिली आहे. मात्र अंतिम निर्णय हा संबंधित पक्षाचाच असतो, त्यामुळे त्या निर्णयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्प कोण सादर करणार?
मुंबईच्या महापौर पदाबाबत दोन दिवसांत निर्णय
महापौर पदाच्या निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुतीतील संबंधित पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. मुंबई तसेच इतर शहरांतील महापौर पदासाठी जी नावे पुढे आली आहेत, त्यावर येत्या एक-दोन दिवसांत चर्चा केली जाईल. त्यानंतर अंतिम नावे निश्चित केली जातील. संबंधित महानगरांचे अध्यक्ष आणि आमदार योग्य तो निर्णय घेतील. नागपूरच्या महापौर पदासंदर्भातही एकूण चर्चा झाली असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.