Home ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले….

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले….

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले….

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना अमानुषपणे गरम सूरीने हातांना आणि पायांना चटके दिल्याची बातमी समोर आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकं काय घडलं?

१० ते १५ डिसेंबर दरम्यान ही घटना घडली असून , मुलांच्या शाळेतून शिक्षकांचे पैसे चोरल्याचे तक्रारी येत होत्या तसेच, घरातीलही पैसे गायब होत होते. पैसे आपलीच मुलं चोरत आहेत. असा संशय मुलांच्या वडिलांना आला, म्हणून मुलांना शिक्षा देत. आरोपींने मुलांना गरम सुरीने हाताना आणि पायांना चटके दिल्याची अमानुष घटना समोर आली आहे.

पोलीस तपासात आरोपीने हे कृत्य संतापाच्या भारत केल्याचे समोर आले आहे. मुलांच्या तक्रारींनंतर तसेच माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दाखल घेत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. जखमी मुलांवर उपचार करण्यात येत असून पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत