Home ताज्या घडामोडी आंगणेवाडी भराडी देवी जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २६ रोजी

आंगणेवाडी भराडी देवी जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २६ रोजी

आंगणेवाडी भराडी देवी जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २६ रोजी

मसुरे : प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या, नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. बुधवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.