Home ताज्या घडामोडी मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५ रोजी एकूण २३ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्र. ०१०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष, ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१०१३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदानापूर अनारक्षित विशेष, ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१०७९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपुर विशेष ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २२.३० वाजता सुटेल.

गाडी क्र. ०११४३ लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर विशेष ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.३० वाजता सुटेल. क्र. ०१०४३ लोकमान्य टिळक टर्मिनस-मुजफ्फरपुर विशेष ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०४२२५ लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी विशेष ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.५५ वाजता सुटेल.

गाडी क्र. ०१४३१ पुणे-गाझीपूर सिटी विशेष ही गाडी पुणे येथून सकाळी ०६.४० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४१५ पुणे-गोरखपूर विशेष ही गाडी पुणे येथून ०६.५० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४४९ पुणे-दानापूर विशेष ही गाडी पुणे येथून १५.३० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४८३ पुणे-हजरत निजामुद्दीन विशेष ही गाडी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४०३ पुणे-अमरावती विशेष ही गाडी पुणे येथून रात्री १९.५५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४०१ पुणे-नागपूर विशेष ही गाडी पुणे येथून रात्री २०.३० वाजता सुटेल.

गाडी क्र. ०१२०२ हडपसर नागपूर विशेष ही गाडी हडपसर येथून दुपारी १५.५० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४३० हडपसर-लातूर विशेष ही गाडी हडपसर येथून १६.०५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०७६०८ हडपसर-नांदेड विशेष हडपसर ही गाडी येथून २२.५० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४२१ दौंड-कलबुरगी अनारक्षित विशेष ही गाडी दौंड येथून पहाटे ०५.०० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४५१ कोल्हापूर-कलबुरगी विशेष ही गाडी कोल्हापूर येथून सकाळी ०६.१० वाजता सुटेल.

गाडी क्र. ०६२०८ कलबुरगि गाडी-बंगळूरु छावणी विशेष ही गाडी कलबुरगी येथून सकाळी ०९.३५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४२२ कलबुरगी-दौंड अनारक्षित विशेष ही गाडी कलबुरगी येथून दुपारी १६.१० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४५२ कलबुरगी-कोल्हापूर विशेष ही गाडी कलबुर्गी येथून १८.१० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१४२९ लातूर-हडपसर विशेष ही गाडी लातूर येथून ०९.३० वाजता सुटेल.

गाडी क्र. ०१४१० नागपूर-पुणे विशेष ही गाडी नागपूर येथून १६.१० वाजता सुटेल. गाडी क्र. ०१०१२ नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ही गाडी नागपूर येथून २२.१० वाजता सुटेल.