Home महामुंबई मुंबई मनपा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ची धुरा नवाब मलिकांकडे

मुंबई मनपा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ची धुरा नवाब मलिकांकडे

मुंबई मनपा निवडणुकीत  ‘राष्ट्रवादी’ची धुरा नवाब मलिकांकडे

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोपवली आहे.

मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आमदार सना मलिक-शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे यांची तर निमंत्रित म्हणून जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, अजय विचारे, अर्शद अमीर, इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव आदींचा समावेश आहे.