मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा विक्रमी पाणीसाठा जमा झाला आहे, ज्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाच, धरणांमधील पाणीपातळी ७५.७९% पर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच काळात हा पाणीसाठा केवळ २९.७३% इतकाच होता, त्यामुळे यंदाची वाढ लक्षणीय आहे.
https://prahaar.in/2025/07/15/rain-havoc-in-mumbai-cars-under-water-in-andheri-local-and-air-services-disrupted/
सात धरणांपैकी मोडक सागर धरण तर ९ जुलैपासूनच ओसंडून वाहत आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी ही वाढलेली पातळी अत्यंत महत्त्वाची असून, यामुळे पुढील काही महिने पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.