पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव आणि अत्यंत उपयुक्त
रोहा : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कांटीचे प्राथमिक शिक्षक शरद बबन घुले यांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव आणि अत्यंत उपयुक्त शैक्षणिक ॲप्स विकसित केले आहेत.
मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा सखोल विचार करून तयार केलेले हे ॲप्स शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायक, सुलभ आणि प्रभावी बनवत आहेत. सध्या त्यांची पहिली, चौथी आणि पाचवीची ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत, तर दुसरी आणि तिसरीची ॲप्स चाचणी टप्प्यात आहेत.
ॲप्स विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेनुसार तयार केली आहेत. लहान मुलांच्या आकलन क्षमतेचा आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास करून प्रत्येक ॲप डिझाइन केले आहे. यामुळे मुलांना शिकणे ओझे न वाटता, एक खेळ वाटतो. तसेच मुले आपल्या गतीने व वेळेनुसार शिकू शकतात.
ॲप्सचा वापर अत्यंत सोपा असून, लहान मुलेही ती सहजपणे हाताळू शकतात. आकर्षक रंगसंगती, मोठी आणि स्पष्ट फॉन्ट यामुळे मुलांना ॲप्स वापरताना कंटाळा येत नाही. इंटरफेस अत्यंत यूजर-फ्रेंडली असल्याने पालकांनाही मुलांना ॲप्स वापरण्यासाठी मदत करावी लागत नाही.
येथे क्लिक करा आणि पहा हे ‘ॲप्स’
ॲप्सचे एक महत्त्वाचे व अभिनव वैशिष्ट्य आहे. प्रत्येक वेळी ॲप उघडल्यावर किंवा नवीन सराव करताना विद्यार्थ्यांना नवीन प्रश्न मिळतो. यामुळे प्रश्नांची पुनरावृत्ती टाळता येते आणि मुलांचा सराव अधिक व्यापक होतो. यामुळे घोकंपट्टी न होता, मुलांना संकल्पना समजून घेण्यास मदत होते.
प्रश्नाची निवड करताच किंवा उत्तर दिल्यावर लगेच निकाल स्क्रीनवर दिसतो. यामुळे मुलांना त्यांच्या प्रगतीची तत्काळ कल्पना येते. विशेषतः ५ वी शिष्यवृत्ती ॲपमध्ये प्रत्येक प्रश्नाचे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे मुलांना चुकीच्या उत्तरामागील कारण समजून घेता येते आणि त्यांची संकल्पना अधिक स्पष्ट होते.
शिकणे अधिक रंजक बनवण्यासाठी ॲप्समध्ये चित्रांचा आणि आवाजाचा योग्य वापर केला आहे. उदा. प्राण्यांची चित्रे, त्यांच्या आवाजासह दाखवली जातात, ज्यामुळे मुलांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजतात आणि त्या लक्षात ठेवण्यास मदत होते. ऑडिओ-व्हिज्युअल साधनांचा वापर मुलांची आकलनशक्ती वाढवतो.
ही ॲप्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर शिक्षक आणि पालकांसाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. शिक्षक या ॲप्सचा वापर वर्गात पूरक शैक्षणिक साहित्य म्हणून करू शकतात, तर पालक मुलांना घरी शिकवण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. पालकांना मुलांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे सोपे जाते.
पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठीचे शिष्यवृत्ती ॲप आहे. या ॲपमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न, तत्काळ निकाल आणि प्रत्येक प्रश्नाचे मराठी व इंग्रजीमध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यास मदत होईल.
App very very must
सर्व ॲप खूप उत्कृष्ट दर्जाचे आहेत विद्यार्थ्याला शिकण्यासाठी खूप उपयोगी पडतील
Comments are closed.