Home महाराष्ट्र ठाणे पर्यावरणपूरक-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल

पर्यावरणपूरक-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल

पर्यावरणपूरक-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

ठाणे  : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या इ-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिणी पाटील, इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे हे उपस्थित होते.

https://prahaar.in/2025/06/30/bjps-political-move-at-the-beginning-of-the-monsoon-session-kunal-patil-apurva-hire-may-join-bjp/

मंत्री सरनाईक म्हणाले की, सन २०३० पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये २० ते ३० टक्के वाहने ही विजेवर चालणारी असावीत, असे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने इ-वाहनांना टोल माफी व खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनाने आखली आहे. याचा फायदा इ-ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.

तसेचच इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये इ-ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळ जवळ शून्य आहे. तसेच वापर करताना लागणाऱ्या वीजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत ६० ते ७० टक्के ने कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा ‘किमयागार’ ठरणार आहे. ऑटोनेक्स्ट या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी निर्मित इ-ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे.