विरार : वसई येथील २० वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळेच दीड महिन्याच्या कालावधीनंतरही आरोपी आणि त्याचा मुलगा फरार आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी वसई पोलीस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
https://prahaar.in/2025/06/18/forest-sage-maruti-chittampally-passes-away-at-the-age-of-93/
वसई येथे राहणाऱ्या रेवती निळे (२०) या तरुणीने २८ एप्रिल रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तिचा प्रियकर आयुष राणा याने तिला लग्नाला नकार दिला, तसेच मांत्रिक असलेले आयुषचे वडील अजय राणा यांनी तिला तू खालच्या जातीची आहेस, तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे असे म्हटले होते, असा आरोप रेवतीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात वसई पोलिसांनी विलंबाने गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अद्यापही अटक केली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी वसई पोलीस ठाण्यात भेट दिली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप दमानिया यांनी यावेळी केला. आरोपी हा तांत्रिक असून, त्याचे पोलिसांची संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.