Home ताज्या घडामोडी मध्य रेल्वेच्या गाड्यांना सुधारित डब्यांची रचना

मध्य रेल्वेच्या गाड्यांना सुधारित डब्यांची रचना

मध्य रेल्वेच्या गाड्यांना सुधारित डब्यांची रचना
The rake of the TEJAS Train, being inspected by the Union Minister for Railways, Shri Suresh Prabhakar Prabhu, at Safdarjung Railway Station, in New Delhi on May 19, 2017.

मुंबई : मध्य रेल्वे काही गाड्यांच्या सेवा सुधारित संरचनेसह चालवणार आहे.
ट्रेन क्रमांक १२२२३/१२२२४ लोकमान्य टिळक टर्मिनस-एरनाकुलम-दुरांतो एक्सप्रेस आता एक अतिरिक्त २ टियर वातानुकूलित आणि ३ टियर वातानुकूलित कोचसह चालेल.

https://prahaar.in/2025/06/12/boeing-risks-become-catastrophic-as-the-aircraft-ages-whistleblower-warning-reignites-safety-debate/

१२२२३ लोकमान्य टिळक टर्मिनस-एरणाकुलम दुरांतो एक्सप्रेस १४ जूनपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून चालेल तर १२२२४ एरनाकुलम-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस १५ जूनपासून एर्नाकुलम येथून चालेल. या गाडीला एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, ३द्वितीय वातानुकूलित श्रेणी, ७ तृतीय वातानुकूलित श्रेणी, ८ शयनयान, १ पॅन्ट्री कार आणि २ सामान/जनरेटर कम गार्ड ब्रेक व्हॅन. अशी रचना असेल.

ट्रेन क्रमांक १८०२९/१८०३० लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस आता एलएचबी कोचसह आणि २ अतिरिक्त जनरल सेकंड क्लास कोचसह चालेल. १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस २१ जून पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून चालेल तर १८०३० शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १९. जून पासून शालिमार येथून चालेल या गाडीला २ द्वितीय वातानुकूलित श्रेणी, ५ तृतीय वातानुकूलित श्रेणी, ६ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, २ सामान/जनरेटरसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि ४ भाडेतत्त्वावर घेतलेल्या पार्सल व्हॅन. असे डब्बे असतील .

ट्रेन क्रमांक १७६११/ १७६१२ नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्य राणी एक्सप्रेस आता १ अतिरिक्त ३ टियर वातानुकूलित कोच आणि २ अतिरिक्त शयनयान कोचसह चालेल. १७६११ हजूर साहिब नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ४ ऑगस्टपासून हजूर साहिब नांदेड येथून चालेल तर १७६१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस ५ ऑगस्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून चालेल. या गाडीला एक वातानुकूलित फर्स्ट क्लास कम वातानुकूलित २ टियर, एक द्वितीय वातानुकूलित श्रेणी, ३ तृतीय वातानुकूलित श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.असे डब्बे असतील.