अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचं लंडनला जाणारं AI-171 हे विमान टेकऑफनंतर काही क्षणांतच कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात एकूण २४२ प्रवासी, त्यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. या अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते, अशी माहिती पुढे आली आहे. ते विमानाच्या दुसऱ्या रांगेत बसले होते आणि त्यांचं तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
https://prahaar.in/2025/06/12/ahmedabad-plane-crashes-near-medical-college/
पण… विजय रुपाणी सुरक्षित आहेत का?
दुर्दैवाने, विजय रुपाणी यांच्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि गुजरातच्या राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
मदतकार्य युद्धपातळीवर
विमान कोसळताच मेघानीनगर परिसरात भीषण स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. नागरिक, वैद्यकीय पथकं, पोलीस आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी तातडीने तैनात करण्यात आले आहेत.