नवी दिल्ली : भारताने ४ जून २०२५ रोजी पाकिस्तानच्या दक्षिण सीमेच्या जवळ भारतीय वायुदलाच्या (IAF) सरावासाठी हवाई हद्द राखून ठेवली असून, यासाठी NOTAM (Notice to Airmen) जारी करण्यात आला आहे. हा एकदिवसीय लष्करी ड्रिल असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या विमानांसाठी भारतीय हवाई हद्द वापरण्यावर असलेली बंदी २३ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी नुकतेच स्पष्ट केले.
ही बंदी पाकिस्तान नोंदणीकृत विमान, तसेच त्यांच्याकडून चालवलेली, मालकी असलेली किंवा भाड्याने घेतलेली प्रवासी आणि लष्करी विमानं यांना लागू आहे. मागील काही सुरक्षेच्या घटनांमुळे भारताने हा निर्णय कायम ठेवला आहे.
https://prahaar.in/2025/06/04/ukraines-second-major-attack-on-russia-in-72-hours-ukraine-attacks-crimean-bridge-with-1100-kg-of-explosives/
इंडिगो विमानाला वळण नाकारलं, वाद वाढला
२१ मे रोजी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट (6E 2142) ला पठाणकोट परिसरात वादळी हवामान आणि गारपिटीचा सामना करावा लागला. विमानाने दिशा बदलून आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने वळण घेण्याचा प्रयत्न केला, पण वायुदलाच्या नॉर्दर्न कंट्रोलने परवानगी नाकारली. नंतर लॉर एटीसीकडेही पाकिस्तानी हद्दीत प्रवेशाची विनंती करण्यात आली, पण तिथेही नकार मिळाला.
तुर्कीची ‘सेलेबी’ कंपनीवर सुरक्षा कारणास्तव बंदी
दुसऱ्या एका मोठ्या निर्णयात, तुर्कीची ‘Celebi Airport Services’ या ग्राउंड हँडलिंग कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली आहे. मंत्री नायडू म्हणाले की, “राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून विमानतळांवरील कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही.”
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७० टक्के ग्राउंड सेवा ही ‘सेलेबी’च सांभाळत होती. प्रवासी हाताळणी, माल वाहतूक, पोस्टल सेवा, गोदाम व्यवस्थापन, एअरब्रिज सेवा यासाठी ही कंपनी जबाबदार होती.