Home ताज्या घडामोडी मनपाच्या बस सेवेत महिलांना ५० टक्के सवलत

मनपाच्या बस सेवेत महिलांना ५० टक्के सवलत

मनपाच्या बस सेवेत  महिलांना ५० टक्के सवलत

विरार : वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेत १ जूनपासून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे.

https://prahaar.in/2025/05/24/flying-squads-to-prevent-black-marketing-of-seeds-and-fertilizers/

त्याच धर्तीवर महापालिकेने सुद्धा महापालिका क्षेत्रातील महिलांना मनपाच्या परिवहन सेवेत सवलत द्यावी अशी मागणी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.

त्यानुसार १ जूनपासून वसई-विरार महापालिका क्षेत्रात चालणाऱ्या महापालिकेच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी घेतला आहे. या निर्णयाबाबत त्यांनी आमदारांना सुद्धा कळविले आहे.