Home ताज्या घडामोडी तामिळनाडू : तामिळनाडूत बस-टेम्पोची आमने सामने धडक! ५ जणांचा मृत्यू

तामिळनाडू : तामिळनाडूत बस-टेम्पोची आमने सामने धडक! ५ जणांचा मृत्यू

0
तामिळनाडू : तामिळनाडूत बस-टेम्पोची आमने सामने धडक! ५ जणांचा मृत्यू

तंजावर : तामिळनाडूमध्ये तंजावर-तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. सेंगकीपट्टी पुलाजवळ सरकारी बस आणि खासगी टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला.

तंजावरच्या जिल्हाधिकारी प्रियंका बालसुब्रमण्यम यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.