पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी!
कराची : पाकिस्तानातून आलेल्या मोठ्या वृत्तानुसार, रावळपिंडी येथील क्रिकेट स्टेडियमजवळ आज भारतीय ड्रोनने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आज रात्री ८ वाजता पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यातील सामना याच मैदानावर होणार होता. मात्र, हल्ल्यानंतर वातावरण तापले असून सामना तात्काळ रद्द करण्यात आला आहे.
पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ड्रोन स्टेडियमजवळील झाडावर आदळला, त्यामुळे परिसरातील दुकानांच्या काचा फुटल्या आणि एक नागरिक गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाच्या आवाजाने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आणि सुरक्षा यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
https://prahaar.in/2025/05/08/india-counters-pakistan-escalation-bid-destroys-air-defence-system-in-lahore/
या घटनेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि सरकार यांच्यात तातडीने उच्चस्तरीय चर्चा सुरू झाली आहे. एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने दिलेल्या माहितीनुसार, अनेक परदेशी खेळाडू हा हल्ला अनुभवून धास्तावले आहेत आणि त्यांनी शक्य तितक्या लवकर पाकिस्तानमधून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. “आता पुढील सामन्यांचे काय, हे सरकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मिळून ठरवणार आहेत,” असेही त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी यापूर्वीच असा दावा केला होता की लाहोर, गुजरांवाला, चकवाल, बहावलपूर, मियानो, कराची आणि रावळपिंडी येथे परदेशी ड्रोन निष्क्रिय करण्यात आले आहेत. त्यामुळे हा हल्ला आधीच शंका-संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतो.
A PSL match in Rawalpindi was cancelled following a drone attack, leaving foreign players in deep shock. Match was tonight. Many are now seeking to leave the country as soon as possible. The Pakistan Cricket Board (PCB) will make a decision after consulting with the government:… pic.twitter.com/34EGoMebYI
— IANS (@ians_india) May 8, 2025
या हल्ल्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे. क्रिकेटसारख्या ‘जेम्स बॉन्ड सुरक्षा’ दिलेल्या कार्यक्रमातच जर ड्रोन घुसू शकतो, तर मग सामान्य नागरिकांचं काय? हा हल्ला केवळ एक इशारा आहे की भारताकडे आता तंत्रज्ञानाचं प्रचंड बळ आहे आणि गरज पडल्यास ते कोणत्याही पातळीवर शत्रूला भिडू शकतो. त्यामुळेच सध्या पाकिस्तान सरकार, लष्कर आणि PCB तीनही पातळ्यांवर घबराटीचं वातावरण आहे. देशात परदेशी खेळाडू सुरक्षित आहेत का? हे प्रश्नही उभे राहत आहेत. एकीकडे भारत शांतपणे बॉर्डरपलीकडून आपला संदेश देतोय, आणि दुसरीकडे पाकिस्तानला आपली अब्रू झाकण्यासाठी पळता भूई थोडी झाली आहे.