Thursday, May 8, 2025
HomeमनोरंजनVery Parivarik Trailer Launched: कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’ सीझन २ चा...

Very Parivarik Trailer Launched: कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’ सीझन २ चा ट्रेलर लॉन्च

Very Parivarik Trailer launched: बहुप्रतिक्षित कौटुंबिक कॉमेडी शो ‘वेरी पारिवारिक’च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. द वायरल फीवर (TVF) च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर या सिझनचा ट्रेलर उपलब्ध आहे.

या टीव्ही सिरीजच्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. आता हा शो अधिक हास्य, मॅडनेस आणि कौटुंबिक धमाल घेऊन पुन्हा येत आहे. या शोचा प्रीमियर ९ मे रोजी होणार असून, दर आठवड्याला नवीन एपिसोड प्रदर्शित होणार आहे.

‘वेरी पारिवारिक’ सिझन २ ची सुरुवात तिथूनच होते जिथे सिझन १ संपला होता. याचा शोचा ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत असून, प्रेक्षक देखील सीझन २ च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

सिरीजचे क्रिएटर आणि दिग्दर्शक वैभव बंडू म्हणतात, “‘वेरी पारिवारिक’ चा दुसरा सिझन ‘द गॉडफादर (पार्ट ३)’ आणि ‘शिंडलर्स लिस्ट’ पेक्षा ही जास्त मजेशीर आहे. या ट्रेलरचा सगळ्यांनी आनंद घ्या, कारण हा सिझन पूर्णपणे ऑर्गेनिक आहे आणि आमच्या स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे.” या सीझनमध्ये सृष्टी गांगुली रिंदानी, प्रणय पचौरी, परितोष सँड, कनुप्रिया शंकर पंडित, अरुण एस कुमार या कलाकारांचा समावेश असून, हे कुटुंब काय कल्ला करणार ही पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

TVF ने भारतीय मनोरंजनसृष्टीत स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. २०२४ हे वर्ष TVF साठी धमाकेदार ठरले – ‘सपने Vs एव्हरीवन’, ‘वेरी पारिवारिक’, ‘पंचायत सिझन ३’, ‘कोटा फॅक्टरी सिझन ३’ आणि ‘गुल्लक सिझन ४’ यांसारख्या शोज नी फक्त लोकांची मने जिंकली नाहीत, तर अनेक पुरस्कारही पटकावले.

पहा ट्रेलर

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -