Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीMock drills : मुंबईत पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय सुरू राहणार...

Mock drills : मुंबईत पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय सुरू राहणार मॉक ड्रिल

पोलीस महासंचालक (नागरी संरक्षण दल) प्रभात कुमार यांची माहिती

मुंबई : पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉक ड्रिल सुरु राहणार आहे. तसेच वेगवेगळ्या विभागात ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस महासंचालक (नागरी संरक्षण दल) प्रभात कुमार यांनी दिली. मॉकड्रिल दरम्यान सर्वसामान्य लोकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारत सरकारच्या निर्देशानुसार ऑपरेशन अभ्यास अंतर्गत बुधवारी महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी युद्ध परिस्थिती विषयक मॉकड्रिल नागरी संरक्षण दलाच्या नेतृत्वात घेण्यात आले. या संदर्भातील माहिती महापालिका वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस महासंचालक (नागरी संरक्षण दल) प्रभात कुमार, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तथा मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापनाच्या अध्यक्ष डॉ. अश्विनी जोशी उपस्थित होत्या.

https://prahaar.in/2025/05/07/scalp-missiles-worth-rs-8-crore-hammer-bombs-worth-rs-84-lakh-these-deadly-weapons-were-used-in-operation-sindoor/

यावेळी पोलीस महासंचालक (नागरी संरक्षण दल) प्रभात कुमार यांनी माहिती देताना असे सांगितले कि, दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदानात लोकांना एकत्र करून त्यांना युद्धसदृश परिस्थितीत कसे वागावे?, याचं प्रात्यक्षिक देण्यात आले. याशिवाय तारापूर आणि गोवंडी याठिकाणी रात्री ८ वाजता ब्लॅकआउटबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीकरता तयारी म्हणून मुंबईसह सिंधुदुर्ग, कल्याण व विविध ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आले. यावेळी पोलीस, पालिका प्रशासन, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, अग्निशमन दल, एनसीसी कॅडेट आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणाही सहभागी झाल्या होत्या. तर मॉकड्रील दरम्यान मुंबई भागात केवळ दोन ते अडीच मिनिटे सायरन वाजल्याची माहिती पोलीस महासंचालक (नागरी संरक्षण दल) प्रभात कुमार यांनी दिली.

तसेच, तारापूर आणि गोवंडी भागात रात्री ८ वाजता युद्धजन्य परिस्थितीत वापरात येणारी ब्लॅक आउट रणनिती वापरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याबाबत या विभागातील नागरिकांना पूर्वसुचना दिल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली. तसेच पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉक ड्रिल सुरु राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीनुसार सगळ्या यंत्रणा काम करताना दिसल्या. तर सध्या शायरांच्या संख्येवर काम सुरु असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले. तर पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉक ड्रिल सुरु राहणार आहे. तसेच वेगवेगळ्या विभागात ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रभात कुमार यांनी दिली.

मध्यंतरीच्या काळात सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम कमी झाले होते. मात्र, आता नव्याने प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये सिव्हिल डिफेन्स विभाग व मुंबई विद्यापीठात करार करण्यात आला असून अभ्यासक्रमात लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम समाविष्ट केला जाणार आहे. आणि त्यावर काम सुरु असल्याची माहिती पोलीस महासंचालक (नागरी संरक्षण दल) प्रभात कुमार यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -