Home ताज्या घडामोडी Health: काकडी सोलून खावी की न सोलता? जाणून घ्या योग्य पद्धत

Health: काकडी सोलून खावी की न सोलता? जाणून घ्या योग्य पद्धत

Health: काकडी सोलून खावी की न सोलता? जाणून घ्या योग्य पद्धत

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत काकडी अनेकांना खायला आवडते. काकडी टेस्टी असण्यासोबतच हेल्दीही असते. मात्र काकडी खाताना अनेकांच्या मनात असा विचार येतो की काकडी सोलून खावी की न सोलता खावी.

जर तुम्हीही याबाबतीत कन्फ्युज असाल तर जाणून घ्या काकडी खाण्याची योग्य पद्धत. तज्ञांच्या मते काकडी खाण्याची योग्य पद्धत म्हणजे ती सालासकट खावी. काकडीमध्ये व्हिटामिन के, व्हिटामिन सीसह अनेक मिनरल्स आढळतात.

काकडीच्या सालीमध्ये बीटा कॅरोटिन आढळते. अशातच काकडी सालासकट खाल्ल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. काकडी सालासकट खाल्ल्याने यात फायबर मोठ्या प्रमाणात शरीराला मिळते. हे खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहते. तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

जर आपण काकडीची साल काढून खाल्ली तर हे सर्व पोषकतत्वे आपल्याला मिळत नाहीत. दरम्यान, आजकाल काकडी अधिक काळ टिकवण्यासाठी विविध प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. यामुळे काकडी सालासकट खायची असेल तर ती चांगली धुणे गरजेचे असते. शक्य असल्यास काकडी गरम पाण्याने धुवा आणि त्यानंतर खा.