Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीSindhudurg News : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला!

Sindhudurg News : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला!

सिंधुदुर्ग : शिवप्रेमींसाठी आनंदवार्ता समोर आली आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ११ मे रोजी होणार आहे.

४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिनानिमित्ताने मालवण राजकोट किल्ला याठिकाणी किल्ल्याची पुनर्बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा दुर्घटना घडली होती. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने पुनर्बांधणी करण्यात आली. मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रा. लि., गाझिपूर, उत्तर प्रदेश यांच्यामार्गदर्शनाखाली नव्याने पुतळा उभारण्यात आला आहे.

https://prahaar.in/2025/05/03/threat-to-blow-up-shirdis-sai-sansthan-temple-with-a-bomb-police-investigation-underway/

हा शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिवपुतळा , शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची आहे. त्यामुळे शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा बनविण्यात येणार आहे. पुतळ्यासाठी कांस्य धातूच्या ८ मिलीमीटर जाडीच्या पत्र्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. यासाठी वापरण्यात येणारे स्टिल हे स्टेनलेस स्टिल आहे.

पुतळ्यासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या पुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी करण्यात येणार होते परंतु काही कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आले. आता या पुतळ्याचे लोकार्पण ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२:३० ते १:३० दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -