Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडी'छावा' फेम अभिनेत्याच्या घरी लवकर हलणार पाळणा, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

‘छावा’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकर हलणार पाळणा, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

८०० कोटींच्या ‘छावा’ चित्रपटाचा हा अभिनेता होणार बाबा, लग्नाच्या ३ वर्षांनी हलणार पाळणा

‘छावा’ फेम अभिनेता विनीत कुमार सिंहच्या (Vineet Kumar Singh) घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत त्याने याबद्दलची माहिती दिली. विनीतची पत्नी रुचिरा गरोदर असून जुलै महिन्यात बाळाचा जन्म होणार आहे.

‘छावा’ हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. ज्यात विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची दमदार भूमिका साकारली आहे, मात्र त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणारा अभिनेता विनीत कुमार सिंगच्या ‘कवी कलश’ ने देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आधी ‘छावा’ आणि नंतर सनी देओलच्या जाटमध्ये दिसल्यानंतर, आता विनीत कुमार सिंहकडे आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे.

विनीतने इंस्टाग्राम पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करत, ज्यामध्ये लिहिले, “नवीन जीवन आणि आशीर्वाद! या विश्वाकडून, खूप सारे प्रेम घेऊन… लवकरच बाळ येत आहे!! नमस्ते लिटिल वन, आम्ही तुझे स्वागत करण्यास तयार आहोत.”

बाबा होण्यासाठी उत्सुक

पत्नी रुचिरा हिच्या गरोदरपणाची बातमी शेअर करताना विनित कुमार सांगतो, “आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमचे मूल या जगात येण्याची मी आणखीन वाट पाहू शकत नाही. आमच्यासाठी हा अनुभव नवा आहे. आणि मी प्रत्येक क्षणांसाठी तिथेच राहू इच्छितो.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -