Friday, May 9, 2025
Homeदेशराजस्थानमधील जैसलमेरमधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक

राजस्थानमधील जैसलमेरमधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक

जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेरमधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. पठाण खान असे या गुप्तहेराचे नाव आहे. तो भारताशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवत होता. पठाण खान हा आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेसाठी काम करत होता.

राजस्थानमध्ये इंटेलिजन्सच्या पथकाने महिन्याभरापूर्वी पठाण खान याला अटक केली. त्याची महिनाभर चौकशी सुरू होती. आता त्याच्या विरुद्ध १९२३ च्या अधिकृत गुपिते कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पठाण खान याला १ मे २०२५ रोजी गुन्हा नोंदवून औपचारिक अटक करण्यात आली. हाती आलेल्या माहितीनुसार, पठाण खान पहिल्यांदा २०१३ मध्ये पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी गेला होता. यानंतरही अधूनमधून तो पाकिस्तानमध्ये जाऊन आला आहे. पठाण खानने अनेकदा भारताशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवली आहे.

पठाणने नेमकी कोणकोणती माहिती पाकिस्तानला दिली आहे. या माहितीचा पाकिस्तानकडून गैरवापर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार पठाण खानला पाकिस्तानकडून वेगवेगळ्या मार्गान हेरगिरीसाठी पैसा दिला जात होता.

https://prahaar.in/2025/05/02/kedarnath-temple-doors-open-for-devotees-2/

पाकिस्ताकडून सलग आठव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानने सलग आठव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या चौकी – पहारे यांना लक्ष्य करुन गोळीबार केला. भारताने पाकिस्तानच्या गोळीबााला चोख प्रत्युत्तर दिले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तणाव वाढू लागल्यापासून सातत्याने पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.

पाकिस्तानने लहान शस्त्रांद्वारे कुपवाडा, बारामुला, पूँछ, नौशेरा, अखनूरमध्ये भारताच्या चौकी – पहाऱ्यांना लक्ष्य करुन गोळीबार केला. भारत – पाकिस्तान सीमेवर गोळीबार सुरू असल्यामुळे दररोज कित्येक तास स्थानिकांना बंकरमध्येच वास्तव्य करावे लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारी योजनेत सीमेजवळच्या शेकडो गावांमध्ये दर्जेदार बंकर बांधण्यात आले आहेत. या बंकरमध्ये नागरिक सुरक्षित आहेत.

आंतरराष्ट्रीय सीमेवरील आरएस पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये पिकांची कापणी पूर्ण झाली असली तरी, कठुआ, सांबा, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये अजूनही सुरू आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केल्याचे भारताने जाहीर केले आहे. भारत – पाकिस्तान राजनैतिक संबंध कमी करण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -