Friday, May 9, 2025
Homeक्रीडाIPL 2025RR vs MI , IPL 2025: मुंबई इंडियन्सने ठोकला विजयी षटकार, राजस्थानचा...

RR vs MI , IPL 2025: मुंबई इंडियन्सने ठोकला विजयी षटकार, राजस्थानचा १०० धावांनी पराभव

जयपूर: इंडियन प्रीमियर लीगच्या ५०व्या नंबरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयी षटकार ठोकला आहे. मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा विजय आहे. त्यांनी राजस्थानला या सामन्यात तब्बल १०० धावांनी हरवले. या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानसमोर विजयासाठी २१८ धावांचे आव्हान ठेवले आहे. मात्र मुंबईने राजस्थानला ११७ धावांवर रोखले.

सध्याच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा विजय आहे. मुंबईने आतापर्यंतच्या ११ सामन्यांमध्ये सात विजयांसह एकूण १४ गुण मिळवले आहेत. तसेच नेट रनरेटमुळे ते पहिल्या स्थानावर आले आहेत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने ११ सामन्यांमधील त्यांचा हा ८वा पराभव आहे आणि ते प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर आले आहेत. राजस्थानच्या आधी चेन्नई सुपर किंग्सही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले होते.

आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात खराब राहिली. राजस्थानने पहिल्या पाच षटकांत पाच विकेट गमावले होते. पहिल्याच षटकांत वैभव सूर्यवंशीची विकेट पडली. त्यानंतर यशस्वी जायसवाल बाद झाला. नंतर नितीश राणा पॅव्हेलियनमध्ये परतला. नितीशनंतर कर्णधार रियान पराग आणि शिमरॉन हेटमायरही पटापट बाद झाले. यामुळे राजस्थानची अवस्था आणखी खराब झाली. शेवटपर्यंत राजस्थानच्या विकेट एकामागोमाग एक पडत गेल्या. राजस्थानचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही.

तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरूवात जबरदस्त राहिली. रोहत शर्मा आणि रयान रिकल्टन यांच्यात ११६ धावांची भागीदारी झाली. सुरूवातीला दोघांनी सावध फलंदाजी केली मात्र क्रीझवर सेट झाल्यानंतर दोघांनी मोठमोठे शॉट खेळण्यास सुरूवात केली. रिकल्टनने २९ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. तर रोहितने ३१ बॉलमध्ये ५० धावांचा आकडा पार केला. महिष तीक्ष्णाईने ही भागीदारी तोडली. रिकल्टन सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३८ बॉलमध्ये ६१ धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहितनेही विकेट गमावली. त्याने ३६ बॉलमध्ये ५३ धावा केल्या.

त्यानंतर सूर्या आणि हार्दिक यांनी जबरदस्त फलंदाजी केली. विशेष म्हणजे दोघेही २३ बॉल खेळले आणि दोघांनीही प्रत्येकी ४८ धावा केल्या. त्यांच्या या धुंवाधार फलंदाजीच्या जोरावर मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद २१७ धावा केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -