Home देश ‘गजवा अल हिंद’शी काँग्रेसचा संबंध काय ?

‘गजवा अल हिंद’शी काँग्रेसचा संबंध काय ?

0
‘गजवा अल हिंद’शी काँग्रेसचा संबंध काय ?

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तान विरोधात एकवटला आहे. जो – तो पाकिस्तानची कोंडी करा, पाकिस्तानला धडा शिकवा असे बोलू लागला आहे. पण काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते वेगळा विचार करत आहेत की काय, असे चित्र आहे.

https://prahaar.in/2025/04/29/terrorist-who-carried-out-the-pahalgam-attack-was-an-ssg-commando-in-the-pakistan-army/

https://prahaar.in/2025/04/29/who-is-lieutenant-general-pratik-sharma-who-has-a-big-responsibility/

पंतप्रधान मोदी वापरतात तसेच कपडे असलेला एक फोटो काँग्रेसने एक्सवरुन पोस्ट केला आहे. या फोटोत कपडे आहेत. पण कपडे घातलेला माणूस गायब आहे. विशेष म्हणजे मुसलमानांशी संबंधित संघटनेने केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये गजवा अल हिंद असा भारत विरोधी उल्लेख आहे. एकाचवेळी दोन संघटना भारताविरोधात अशी गरळ ओकतात आणि त्यातील एक संघटना भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांपेकी एक आहे.

काँग्रेस सर तन से जुदा अर्थात शिर धडापासून वेगळे करण्याच्या विचाराला प्रोत्साहन देणारी एक्स पोस्ट करते. दुसरीकडे मुसलमानांशी संबंधित संघटना भगवान शंकराचा सर तन से जुदा स्वरुपातला फोटो तयार करुन प्रसिद्ध करते. हा काय प्रकार आहे ? दोन्हीचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे ? असे सवाल भाजपा खासदार डॉ. निशकांत दुबे यांनी उपस्थित केले आहेत.

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने अनेकदा पंतप्रधान मोदींच्या विरोधात हिंसेला चिथावणी दिली आहे. आता भारत – पाकिस्तान तणाव वाढला असताना काँग्रेस तसेच काहीतरी करू इच्छित आहे का ? जर याचे उत्तर हो असेल तर काँग्रेस नेमकी कोणाचे हित साधण्यासाठी धडपडत आहे ?