जळगाव : केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या मुलीची तसेच इतर काही मुलींची छेड काढण्याचा प्रकार मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेत घडला. या प्रकरणी मुलींनी पोलिसांना माहिती देऊनही कारवाई झाली नाही. अखेर राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीच पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.
https://prahaar.in/2025/03/02/ips-officers-will-be-appointed-in-st-corporation/
यात्रेत घटना घडली त्यावेळी त्या भागात एक पोलीस होता. मुलींनी तक्रार करताच तो पोलीस घटनास्थळी आला. पण छेड काढणारे गटाने उभे होते. संख्येने जास्त असल्याचा गैरफायदा घेत त्यांनीच पोलिसाला मारहाण केली, त्यानंतर या प्रकरणात पोलिसांची कारवाई थंडावली आहे; असे एकनाथ खडसे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीच दखल घ्यावी आणि छेड काढणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
https://prahaar.in/2025/03/02/budget-session-of-maharashtra-will-start-from-monday-3-march-issue-of-womens-safety-will-be-discussed/
काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेट एसटी डेपोतील एका रिकाम्या बसमध्ये बलात्कार घडल्याची तक्रार पोलिसांकडे आली. पाठोपाठ राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्याचे वृत्त आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर घडलेल्या या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधक या मुद्यावरुन महायुती सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे.