Home ताज्या घडामोडी America : अमेरिकेत १७ फेब्रुवारीला होणार विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

America : अमेरिकेत १७ फेब्रुवारीला होणार विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

0
America : अमेरिकेत १७ फेब्रुवारीला होणार विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

सोलापूर : अमेरिकेतील सीएटल येथील भारतीय तरुण रेडमंड येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये महाराष्ट्राचे दैवत श्री विठ्ठल-रखुमाई, शेगावचे संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून तत्पूर्वी १५ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना आरंभ करण्यात येणार आहे.

https://prahaar.in/2025/02/12/mumbai-crime-news-2-arrested-for-obscene-posts-on-mscw-chief-rupali-chakankar/

सीएटल परिसरातील रेडमंड येथे साईबाबा मंदिर आहे. याठिकाणी मराठी तरुणांनी महाराष्ट्राचे लोकदैवत श्री विठ्ठल-रखुमाई, संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच संकल्प काही काळापूर्वी सोडला होता. त्याची पूर्तता आता होत आहे. यानिमित्त १५ आणि १६ फेब्रुवारीला गोमाता पूजन, होम-हावन, भजन, यज्ञ, पारायण, हरिपाठ पठण तसेच महाप्रसादाचे वाटप हे कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (दि. १७) श्री विठ्ठल-रखुमाई, संत गजानन महाराज मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मुख्य कार्यक्रम होत आहे. यानिमित्त भारतातील १०८ नद्यांचे जल, पवित्र माती आणली आहे. याचा उपयोग अनुक्रमे अभिषेकासाठी आणि मूर्तीचा पाया भरण्यासाठी केला जाणार आहे.